आपलं रोजचं वावरणं-जगणं इतकं अचानक आणि संपूर्णपणे ठप्प होईल, ह्याची आपल्यापैकी कोणीही याआधी कधी कल्पना तरी केली होती का? नक्कीच नाही, बरोबर ना? पण हे घडलंय.. नव्हे, घडतंय आणि सगळं पूर्ववत व्हायला अजून किती दिवस लागतील, हे कुणीही सांगू शकणार नाही एवढ्यात.
परिस्थिती अगदीच अकल्पित अन् अभूतपूर्व उद्भवलेली आहे खरी! अशा वेळी आर्थिक बाजू खंबीरपणे लावून कशी धरावी, हा प्रश्न आज सगळ्यात जास्त महत्त्वाचा म्हणून ऐरणीवर आलेला आहे. भविष्यात याचा आपल्याला जरासुद्धा आर्थिक ताण जाणवू नये यासाठी काय अन् कसं नियोजन करता येईल, तेच इथे खास तुमच्यासाठी साध्या-सोप्या शब्दांत उलगडून दिलं आहे –
– अनपेक्षित आणीबाणी फंड हवा:
-
- कोणतीही अनपेक्षित आणीबाणी उद्भवली तर किमान सहा महिने आपलं घर सुखेनैव चालू शकेल इतकी घरखर्चाची रक्कम सदैव प्रत्येकाने बाजूला काढून ठेवायलाच हवी.
– पैशांबाबत घिसाडघाई नको:
-
- सर्वसामान्य माणसे गुंतवणूक अथवा खर्च, या दोन्ही बाबत भीतीने अथवा किंवा अतीलोभाने वाहावत जातात. अवघड परिस्थितीत जो-तो विचार करतो की `आता सगळे धंदे बंद पडणार, शेअर मार्केट कोसळणार, रिअल इस्टेटचे वांधे होणार’, वगैरे वगैरे.. या विचारापायी आततायीपणा करून सामान्य माणसे ताबडतोब पॅनिक मोडमध्ये जातात आणि आपली गुंतवणूक मोकळी करून घेण्याची घिसाडघाई करतात.
याउलट, सगळं काही स्मूथली चालू असताना `आता सगळ्या क्षेत्रांत फक्त सुबत्ताच वाढत जाणार’ हा विचार करून, असेल नसेल तेवढ्या रक्कमेची गुंतवणूक करायला धावतात. घिसाडघाई या नाण्याचीच ही खरंतर दुसरी बाजू असते. या दोन्ही बाबतीत सामान्य माणसाच्या पदरी `अपरिमित नुकसान’ या व्यतिरिक्त काहीही पडत नाही. तेव्हा घिसाडघाई (पॅनिक) अथवा अतीलोभ (ग्रीड) या दोन्ही भावनांनी वाहावत जाऊन घेतलेल्या निर्णयांमुळे फक्त आर्थिक फटका व ओढाताण हेच पदरात पडतं.
सूज्ञ-हुशार गुंतवणूकदार तोच, जो या पॅनिक अन् ग्रीड या दोन्ही भावनांपासून अलिप्त राहून चाणाक्षपणे परिस्थितीनुसार आपले आर्थिक निर्णय घेतो.
तेव्हा या अशा वेळी कोणताही आर्थिक निर्णय घिसाडघाईत घेऊ नका.
– उद्दिष्ट सुस्पष्ट हवं
-
-
- : आपली गोल्स् (उद्दिष्टे) अन् प्रायॉरिटीज् यांविषयी जर क्लॅरिटी असेल, सुस्पष्टता असेल तर कधीही अशा अनपेक्षित परिस्थितीचा त्रास तर होत नाहीच, उलट तिचा संधी म्हणून वापर करता येतो. उदाहरणार्थ, तुम्ही जर १५-२० वर्षांनी रिटायर होण्याचं प्लॅनिंग करीत असाल तर एव्हाना नियमितपणे बाजूला काढून ठेवलेल्या रकमेचा अतिशय फायदेशीर वापर करता येऊ शकेल. सद्यस्थितीत अनेक ब्लूचिप कंपन्यांचे स्टॉक्स् इतक्या आकर्षक अन् कमी किंमतीत उपलब्ध आहेत की आत्ता गुंतवलेले पैसे, उद्या जेव्हा सारं काही सुरळीत होऊन व्यापार पुन्हा जोमाने वाढीस लागेल तेव्हा काही पटीत तुम्हाला अभूतपूर्व फायदा मिळवून देऊ शकतात. त्यामुळे आजच्या कोरोनाच्या संकटाचे तुम्ही तुमच्यासाठी संधीत रूपांतर करू शकता, मात्र त्यासाठी उद्दिष्टांची सुस्पष्टता अत्यावश्यक आहे.
-
– वारेमाप लाएबिलिटीज् नको
-
-
- : अनेकदा आपण इमोशनली थोडेसे वाहावत जाऊन `आत्ता, याक्षणी’ असलेल्या परिस्थितीवर आधारित मोठाल्या लाएबिलिटीज् अंगावर घेऊन बसतो. उदाहरणार्थ, पती आणि पत्नी, दोघांचेही इन्कम् आज भरपूर आहे म्हणून दोन-दोन घरं, एक अलिशान एसयुव्ही आणि एक सेदान अशा दोन-दोन गाड्या, दर दोन-अडीच वर्षांनी बदललेलं इंटिरिअर डेकोरेशन, अशा सारखे निर्णय जरी आपल्याला सुखावून जात असले तरी ते क्षणिक असतात. मार्केटच्या अती-दोलायमान स्थितीमध्ये उद्या जर काही प्लस-मायनस् झाले तर याच गोष्टींचे हप्ते आपल्याला वाघनखांसारखे बोचू लागतात. त्यातल्या आनंदाची जागा आता कुतरओढीने व्यापली जाते आणि तोंड दाबून बुक्कयांचा मार सुरू होतो. यांतून बाहेर पडणे फार जिकिरीचे आणि मानसिकरित्या अत्यंत त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे लाएबिलिटीज्चा पुनर्विचार या निमित्ताने सर्वांनी करायलाच हवा. किंबहुना या सर्व पुनर्विचारासाठी लॉकडाऊन ही सुवर्णसंधी ठरू शकते.
-
– हे ही दिवस सरतील
-
-
- : कोणतीही परिस्थिती कायम तशीच राहात नाही, बदलतेच! आज-ना-उद्या हे करोनाचे दिवस सरणार आणि पूर्वायुष्य पुन्हा नव्या जोमाने अन् वेगाने सुरळीत धावू लागणार यात शंका नाही.
-
आणीबाणी फंड – शांतपणे आर्थिक पुनर्विचार – सुस्पष्ट उद्दिष्टे – लिमिटेड लाएबिलिटीज् अशा चतु:सूत्रीचा जर प्रभावीपणे वापर केला तर या करोना लॉकडाऊनचे रूपांतर आपण नक्कीच इष्टापत्ती मध्ये करू शकतो. ती संधी साधणं तुम्हाला जमलं, तर मात्र तुम्ही मनोमन करोनाचे आभार मानल्याशिवाय राहाणार नाही.
ही संधी कशी साधावी याची उत्सुकता असेल तर जरूर संपर्क साधा.