घर कसे घ्यावे? विकत की भाड्याने?

घर कसे घ्यावे? विकत की भाड्याने?

अनेक कुटुंबाना भेडसावणारा आणि गोंधळात टाकणारा प्रश्न! अर्थात्‌, हा अतिशय मोठा अन्‌ महत्वाचा निर्णय आहे कारण आपल्या पुढील आयुष्यावर याचे दूरगामी परिणाम होतात. म्हणूनच निर्णय घेण्यापूर्वी खालील प्रमुख बाबी विचारात घया –
घर हे `अॅसेट’ नाही!
– पूर्वीच्या पिढीनुसार आपल्याकडे चालत आलेला हा सर्वात मोठा गैरसमज आहे.
– अॅसेट म्हणून लोक घर विकत घेतात, जी खरंतर एक लायेबिलिटी आहे.
– नीट समजून घ्या – अॅसेटमुळे पैसे तुमच्या खिशात जमा होतात.
– लायेबिलिटीमुळे पैसे तुमच्या खिशातून काढून घेतले जातात.
– घराची किंमत फक्त `वाढतच जाते’ हा एक कल्पनाविलास आहे. खरंतर, गेली कैक वर्षे घराच्या किंमती स्थिर असून अनेक ठिकाणी तर त्यात घट झालेली दिसते.
– किंमत जरी वाढली तरी तो फायदा तुमच्या खिशात जमा कधीच होत नाही, निव्वळ कागदावरच राहातो.

To know more House Nightmare Blog

आपला इन्कम्‌ आणि इएम्‌आय्‌चे गणित कसे असावे?

कॅश-फ्लो आपण कसा हाताळतो यावर आपले आर्थिक स्वास्थ्य अवलंबून आहे. येणार्या पैशाचा अधिकाधिक भाग जर फक्त विविध कर्जांचे हप्ते वा देणी फेडण्यात जात असेल तर तुमची आर्थिक तंदुरुस्ती व्हेन्टिलेटर वर आहे असे समजा.

याबाबत एक सोपा नियम लक्षात ठेवा – इन्कम्‌च्या ३० टक्के पेक्षा अधिक देणी असता कामा नयेत.

इएम्‌आय्‌ आणि भाडे यांचे प्रमाण
“जेवढं भाडं द्यायचंय तेवढा इएम्‌आय्‌ भरला तर निदान एक अॅसेट तरी गाठीशी असेल’’ असा युक्तिवाद तुम्ही ऐकला असेलच. मात्र आजकाल यांत एवढी तफावत आहे की हा सल्ला प्रमाण मानलात तर तुमचं काही खरं नाही.
यावर उपाय एकच – जी प्रॉपर्टी तुम्ही विकत घ्यायचा विचार करीत आहात त्याच प्रॉपर्टीचं भाडे आणि लागू होणारा इएम्‌आय्‌ यांची तुलना करा. भाड्याच्या चौपट किंवा त्याहून अधिक इएम्‌आय्‌ जर तुम्हाला भरावा लागणार असेल तर शहाण्याने ती प्रॉपर्टी विकत न घेता भाड्याने घेण्यातच जास्त हित आहे.
आयुष्यात प्राधान्याने साध्य कराव्याशा वाटणार्या इतर गोष्टी
घर घेणं म्हणजे आयुष्याची इतिकर्तव्यता नव्हे. घरा व्यतिरिक्त देखील अनेक गोष्टी आपणांस साध्य करायच्या असतात. त्या जाणून घेणे गरजेचे आहे.
त्यासाठी आधी आपल्या आयुष्याचा एक पट डोळ्यासमोर ठेवून स्वत:लाच खालील प्रश्न विचारा –
– व्यक्तिश: आपल्यासाठी सर्वात महत्वाचं काय आहे?
– नक्की काय साध्य करायचं आहे?
– करिअर साठी शहर, राज्य अथवा देश सोडून जाण्याचा विचार / गरज आहे का?

(वानगीदाखल वर फक्त थोडेसेच प्रश्न दिले आहेत. पण अशी अनेक उत्तरे सल्लागाराच्या मदतीने आपण शोधून सर्वात चांगल्या पर्यायावर येऊ शकतो.)
वरील बाबी विचारात न घेता केवळ घरचे अथवा भोवतालचे सगळे म्हणतात म्हणून घर घेण्याचा निर्णय घेतलात, तर चुकीचा निर्णय घेऊन `लॅण्ड ऑफ नो रिटर्न’ मध्ये खितपत पडायची वेळ तुमच्यावर येऊ शकते. लक्षात ठेवा, मागणी पुरवठ्यात असलेली महाप्रचंड तफावत पाहाता, आजकाल अथवा इथून पुढे, रिअल इस्टेट चटकन्‌ विकून लिक्विड कॅशमध्ये रूपांतरित करता येणे खूपच अवघड होत जाणार आहे.

1 Comment

  1. shrinivas says:

    Thanking you for guiding about Real estate dilemma .
    This is good initiative to create Financial literacy among us to avoid Financial troubles in life .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *